Saturday, December 12, 2015

शाळा.. आणि पावसाळा.

शाळा.. आणि पावसाळा..दोघ आसपास एकत्रच सुरू व्हायचे..
नविन रेनकोट, रंगीत छत्री घेऊन शाळेत जाताना कितीही हुशार असले, तरी साले सगळेच मित्र वेडे वाटायचे..
रस्त्यावरच पाण्याच डबकं मस्ती करायचा एक बहाणाच वाटायचा..
गमबूटचा उपयोग चालण्यासाठी कमी, पाणी भरून मस्ती करण्यासाठी जास्त व्हायचा.. लहानपणीची शाळा, पावसाळा खुप छान होतं..

आता सगळे मोठे झाले, दुनियादारीचा पावसात पाण्याच्या पावसातली मैत्री वाहुन गेली..
पण पाऊस अजून पडतो आहे, फक्त माझा प्रत्येक मित्र एकटा भिजतो आहे.

No comments:

Post a Comment