Saturday, December 12, 2015

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर
केळकर काकांबद्दल काकांच्याच
कचेरीतल्या केशवने काकूंसमोर
कागाळी केली. काकू कावल्या.
काकूंनी कपाटातून कात्री काढून
काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद
कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद
केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच
किचनमध्ये 'कजरारे-कजरारे'कवितेवर
कोळीनृत्य केले.
काकूंनी कागद कापल्याचे कळताच
काका कळवळले. काकांनीही कमालच केली.
काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस
कात्रीने कराकरा कापले. काका काय
करताहेत काकूंना कळेनाच !
काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला.
काका काकूंची कसली काळजी करणार !
काकांना कामाची काळजी.काकूंच्या
कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने
कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन- कपटे
काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.
कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर
कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे
काकांनी ''कोलाज '' करून कामकाज
कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे
कळताच काकांनी काट्यानेच
काटा काढला.
काकांनी केशवालाच कोलाजचे काम
करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने
काकांवरच
कामचुकारपणाचा कांगावा करून
कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे
केशवाला कामावरून काढले. कासावीस
काकूंनी कालच्या कडू
कारल्याची कोशिंबीर कटाप करून
काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून
कालवण केले.
काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस
कुरवाळले. केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात
कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच.
कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात
कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर
काबीज केले. कामावरून काढलेल्या केशवाने
कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर
कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने
केशवाला कबड्डीचा कर्णधार केला.
क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले.
कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच
केला 'कबड्डीतल्या किचकट
कसरतींचा कर्ता'!

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला.

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला.*
*."दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला.*
*."उंदीर कुठे पार्क करू.? लॉट नाही सापडला".*
*.मी म्हटले"सोडून दे, आराम करू दे त्याला".*
*."तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस.?.*
*.मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस.?".*
*."मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक.*
*.तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक.*
*."इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो.*
*.भक्तांना खुश करेपर्यत खूप खूप दमतो".*
*."काय करू आता माझ्याने manage होत नाही.*
*.पूर्वीसारखी थोडक्यात माणसे खुशही होत नाहीत".*
*."immigration च्या requests ने system झालीये hang.*
*.तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग".*
*."चार-आठ आणे देऊन काय काय मागतात.*
*.माझ्याकडच्या files नुसत्या वाढतच राहतात".*
*."माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation.*
*.management च्या theory मध्ये मिळेल तुला solution".*
*."M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे.?.*
*.Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे.?".*
*."असं कर बाप्पा एक Call Center टाक.*
*.तुझ्या साऱ्या दूतांना एक-एक region देऊन टाक".*
*."बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको.*
*.परत जाऊन कुणाला, दमलो म्हणायला नको".*
*.माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झाल.ा*
*."एक वर देतो बक्षीस, माग हवं ते म्हणाला".*
*."CEO ची position, Townhouse ची ownership.*
*.immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship".*
*.मी हसलो उगाच,"म्हटलं खरंच देशील का सांग.?".*
*.अरे मागून तर बघ, थोडी देणार आहे टांग.?.*
*."पारिजातकाच्या सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं.*
*.सोडून जाता येणार नाही, असं एक तरी बंधन हवं".*
*."हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव.*
*.प्रत्येकाच्यामनात थोडा मायेचा शिडकाव".*
*."देशील आणून मला माझी हरवलेली नाती.?.*
*.नेशील मला परत जिथे आहे माझी माती.?".*
*."इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं.*
*.आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं.?".
*."कर्कश्श वाटला तरी हवा ढोल-ताशांचा गजर.*
@
*.भांडणारा असला तरी चालेल, पण हवा आहे शेजार".*
*."यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान.*
*.देशील का रे देवा, यातलं एक तरी दान.?".*
*."तथास्तु"म्हणाला नाही, बाप्पा नुसता सोंडेमागून हसला सारं हाताबाहेर गेलंय
पोरा,"सुखी रहा"म्हणाला. . . . .....
मुली !!
घरामध्ये जेव्हा मुलगी बोलते आणि बोलतच राहते तेव्हा घरातील प्रत्येक जण म्हणतो, "तोंड दुखत नाही का तुझं? किती बडबड, बडबड !"
आणि जेव्हा मुलगी शांत असते तेव्हा आई म्हणते, "बरी आहेस ना तू?"
वडील म्हणतात, "आज घरामध्ये एवढी शांतता का बरं?"
भाऊ म्हणतो, "रागावलीस का?"
आणि जेव्हा ती सासरी जाते, तेव्हा सगळे म्हणतात, "असं वाटतं घराची शोभाच गेली !"
""मुलगी म्हणजे घरातील खळाळतं अविरत संगीत !""
""मुलगी म्हणजे भावना, मोहकता, गोडवा आणि प्रामाणिकतेला समर्पित व्यक्ती !!""
""मुलींनी मुलगी असण्याचा व ज्यांना मुलगी आहे त्यांनी गर्व बाळगला पाहिजे !!!""
""तीचे अस्तित्व कधीच विसरता येणार नाही व तीची अनुपस्थिती बेचव जीवना सारखी असते !!!!!""
आपल्या जीवाभावाच्या  "
स्री" ला नक्की पाठवा ! मग नातं काही ही असो !!👍💐👌👌
 एक होता चिमणा व एक
होती चिमणी..
दोघात खूप
प्रेम होते..
एके
दिवशी चिमणी चिमण्याला म्हणाली.. तू
... मला सोडून,,उडून तर जाणार नाहीस
ना?...
...
तेंव्हा चिमणा म्हणाला मी जर उडून
गेलो तर तू मला पकडून घेशील...
चिमणी म्हणाली मी तुला त्यावेळी पकडू
तर
शकेल पण तुला मिळवू
नाही शकणार.. हे
ऐकुन चिमण्याचे डोळे भरून आले..
त्याने आपले पंख छाटून
टाकले..
आणि चिमणीला म्हणाला आता तर
ठीक आहे ना...?
आता आपण नेहमी सोबत राहू... ...... एके
दिवशी जोराचे वादळ
सुटले..
चिमण्याला पंख नसल्याने तो उडू
शकत
नव्हता.. चिमणी मात्र....
तो चिमणीला म्हणाला तू उडून जा..
चिमणीने
त्याला स्वताची काळजी घे असे
सांगून उडून गेली..
थोड्या वेळाने वादळ शमले... चिमणी परत आली..
पाहते तर चिमणा मरून
पडला होता..
बाजूच्या फांदीवर लिहिले होते..
प्रिये..
फक्त एकदा ..एकदाच जर तू मला म्हटले असते
कि मी तुला सोडून नाही जाऊ
शकत..
तर
कदाचित हे वादळहि माझे
काही बिघडवू शकले नसते... प्रेम हे असेच असते...
"जपुन टाक पाऊल...
इथे प्रत्येक वाट आपली नसते जपुन ठेव विश्वास...
इथे प्रत्येक माणुस आपला नसतो जपुन घे निर्णय...
इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो जपुन ठेव आठवण...
इथे प्रत्येक क्षण सारखा नसतो जपता जपता एक कर..
जपुन ठेव मन कारण...
"तेच फक्त'आपलं'असतं".....
"नशा"
"महोब्बत "
का  हो
"शराब"
का हो ...- या -
"व्हाट्सप्प "
का  हो
" होश "
तीनो मे खो जाते  है
" फर्क "
सिर्फ इतना है की,
"शराब"
सुला देती  है  ..
"महोब्बत "
रुला  देती  है ,
- और -
"व्हाट्सप्प " यारो  की
याद दिला  देती  है  ..!
      समर्पित
सभी प्यारें  दोस्त के लिए ... 💯  

शाळा.. आणि पावसाळा.

शाळा.. आणि पावसाळा..दोघ आसपास एकत्रच सुरू व्हायचे..
नविन रेनकोट, रंगीत छत्री घेऊन शाळेत जाताना कितीही हुशार असले, तरी साले सगळेच मित्र वेडे वाटायचे..
रस्त्यावरच पाण्याच डबकं मस्ती करायचा एक बहाणाच वाटायचा..
गमबूटचा उपयोग चालण्यासाठी कमी, पाणी भरून मस्ती करण्यासाठी जास्त व्हायचा.. लहानपणीची शाळा, पावसाळा खुप छान होतं..

आता सगळे मोठे झाले, दुनियादारीचा पावसात पाण्याच्या पावसातली मैत्री वाहुन गेली..
पण पाऊस अजून पडतो आहे, फक्त माझा प्रत्येक मित्र एकटा भिजतो आहे.

मी काय विसरलो???

मी काय विसरलो???
.
.
.
घरात टी वी आला, मी वाचन विसरलो।
दारात गाडी आली, मी चालणे विसरलो|
हातात मोबाईल आला, मी पञलेखन विसरलो!
कॅलक्युलेटर वापरामुळे, पाढेच म्हणणे विसरलो।
ए सी च्या संगतीने, झाडाखालचा गारवा विसरलो।
शहरात राहीले मुळे, मातीचा वासच विसरलो।
बँकखाती संभाळताना, पैशाची किंमत विसरलो।
बिभत्स चित्रामुळे, सौंदर्य पहाणे विसरलो।
कृत्रिम सेंटच्या वासाने, फ़ुलांचा सुगंध विसरलो।
फ़ास्ट फ़ूडच्या जमान्यात, तृप्तीची ढेकर विसरलो।
स्वार्थी नाती जपल्यामुळे, खरे प्रेम करणे विसरलो।
क्षणीक सुखाचे लोभात, सत्कर्मातला आनंद विसरलो।
माझीच तुमडी भरताना, दुस-यांचा विचार करणे विसरलो।
सतत धावत असताना, क्षणभर थांबणं विसरलो।
WhatsApp आल्यापासून, सुखाने झोपणेही विसरलो।

गणिताच्या तासाला फेसबुक ओपन केलं....

गणिताच्या तासाला फेसबुक ओपन केलं....!
मास्तरनी कमेँट केली - वर्गाच्या बाहेर जा..
मुख्याध्यापकानीमास्तरची कमेँट लाईक केली...
मम्मीनी कमेँट केली - कॉलेजला गेला नसशीलतर भाजी घेऊन ये..
पप्पानी कमेँट केली - तुझ्या लाडाचे परिणाम...
मिञांनी कमेँट केली - ओय कँन्टीन मध्ये येकालची पोरगी आजपण आलीये...
गर्ल फ्रेँडनी कमेँट केली - धोकेबाजमला बोलला आजी सिरीयस आहे म्हणुनदवाखान्यात आहे...
आजीने कमेँट केली.............
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुङदा बसवला तुजा, घरी ये नालायका मी अजुन जीवंत आहे.

पटलं तर घ्या आणि पटवुनच घ्या

पटलं तर घ्या
आणि पटवुनच घ्या
खालील प्रश्नांची उत्तरे शोधा
म्हणजे गणपती कुठे आहे समजेल..!
१.लालबाग चा राजा हा गणपतीच
ना?
जर तो नवसाला पावतो अशी
लोकांची श्रद्धा आहे मग
देव्हाऱ्यात असलेला गणपती हा
वेगळा आहे का ?
मनोभावे पूजन
केल्यावर तो देखील नवसाला
पावणार नाही का?
मग
त्यासाठी लालबाग ला जावेच
लागते असे आहे का ?
२. शास्त्रामध्ये
स्पष्ट सांगितले आहे की मूर्ती शाडू
मातीपासून तयार करावी मग
प्लास्टर पासून तयार केलेली मूर्ती
खरंच शास्त्रोक्त आहे का?
३.
गणपती च्या एवढ्या अवाढव्य
मुर्त्या तयार केल्या जातात की
विधी करण्यासाठी चक्क त्या
मूर्ती वर चढावे लागते , घरी पूजा
करताना देवाच्या पाटाला कधी
पाय लागू न देणारे आपले संस्कार ,
खरच या मोठ्या मूर्तींचे पावित्र्य
राखले जाते का?
४. दरवर्षी या
मोठ्या मुर्त्या पडल्याची एक तरी
दुर्घटना होते , यामुळे अनेकांच्या
भावना दुखावल्या जातात मग
यातून काही बोध घेण्याऐवजी
पुन्हा तीच कृती करणे कितपत योग्य
आहे?
५. या मोठ्या मुर्त्या
विसर्जनाकरिता समुद्रावर नेऊन
मूर्त्यांच्या गळ्यात दोरी टाकून
समुद्रात पाडल्या जातात , हे आपले
विधिवत विसर्जन ?
ही आपली संस्कृती ?
ही आपली धार्मिक श्रद्धा ?
६. लालबाग ला २४-२४
तास रांगेत उभे राहून जीवाचे हाल
करून एका दिवसात पुण्य प्राप्ती
होते का?
त्याऐवजी रोज केवळ १०
मिनिटे आई वडिलांची सेवा
केल्यास कमी त्रासामध्ये जास्त
पुण्य मिळणार नाही का?
मंदिर असो वा मस्जिद देव हा सर्व
ठिकाणी सारखाच आहे ,
आकारांची पूजा करण्याऐवजी
विचारांची पूजा करा , देवाला
केवळ नवस केल्याने इच्छा पूर्ण होत
नाही , त्याला जोड लागते
मेहनतीची , सत्याची आणि
चांगल्या कर्मांची !
ओढ तुझ्याच भक्तीची आशा तुझ्या सेवेची ......

एक कटोरी हातात घेऊन ..

एक कटोरी हातात घेऊन ..
त्यात एक गच्च भरलेली पाणी - पुरी
ती उचलून तोंडात भरायची
तिचं ते गटकन फुटुन तोंडभर पसरणं
मग सगळीकडुन येणारा पूर आणि धूर
कधी तोंडातून .. कधी नाकातून
कानशीलाजवलून वहाणारा ओघळ घामाचा
लागलेला तो ठसका जीवघेणा ..
आणि त्यानंतर रेंगाळलेली ती चव .. हवी हवीशी .!!
.
.
आयुष्यही असच काहीसं ..
रोज त्याला हातात घेऊन उभं रहायचं
नव्याने भरलेली पाणी - पुरी खायची ..
उसळणा-या लाटात मग डुंबायचं की बुडायचं..
ते ज्याचं त्यानेच ठरवायचं
लागतो कधी जीवघेणा ठसकासुद्धा
आणि त्यानंतर जगावसं वाटणारा दिवसनवा नवासा..!!
पण .. फक्त..
"भय्या... ज़रा मिठा बनाना" असे इथेही सांगता आलं असतं तर.. !!!!!!
Unknown....!!!!

वाढदिवसाच्या केकवर वाढदिवस असलेल्या मुलाची/मुलीची प्रतिमा केकने केकवर तयार करून घ्यायची अन मग हर्षोल्हासात ती केक कापायची!

हल्ली एक नवीनच क्रेझ आली आहे.. वाढदिवसाच्या केकवर वाढदिवस असलेल्या मुलाची/मुलीची प्रतिमा केकने केकवर तयार करून घ्यायची अन मग हर्षोल्हासात ती केक कापायची! ... ज्या दिवशी मुलांच्या दीर्घायुष्याची व उज्ज्वल भविष्याची कामना करायची त्यादिवशी केकवर लावलेली त्यांची प्रतिमा कापायची..ती ही त्यांनीच! आपण आपल्या आयुष्याची दोरी कापल्यासारखी! मग त्या केकचे तुकडे करून सर्वांना वाटायचे!.. मुलांचे कौतुक करावे..अगदी आधुनिक पद्धतीने करावे परंतु अशा रीतीने! पटत नाही म्हणण्यापेक्षा योग्य वाटत नाही! .. बरं! पालकांना सांगावं तर त्यांच्या भावना दुखावतात! ..भावना कितीही चांगल्या असल्या तरी त्या व्यक्त करताना आपण नेमके काय करतोय याचा सारासार विचार करायला पाहिजे, असे मला वाटते!
.
काल एका वाढदिवसाला गेले होते..तिथे अतिशय सुंदर केक आणली होती..त्यावर वाढदिवस असलेल्या मुलीची प्रतिमा तयार केली होती..अतिशय आनंदात त्या मुलीने केकवरील आपलीच प्रतिमा कापली..त्याच उत्साहात सर्वांना आनंदात खिलवली! .. विचित्र वाटलं!.. काळाचा कितीही हवाला दिला तरीही विचित्रच वाटलं! .. मला तर ते 'हृदय' आकाराच्या किंवा 'हृदय' काढलेल्या केक्स कापलेल्याही बरोबर नाही वाटत.. हृदय कापायचं अन खायचं!.. भयानकच! .. खरं नसलं तर प्रतिमा तर असतेच नं.. अन कापलेले हृदय कशाचे चिन्ह असते! .. म्हणजे 'दिल के तुकडे तुकडे करके.. मुस्कुरा के खा गये... असेच काहीतरी..'!
.
..अर्थात हे माझे वैयक्तिक विचार आहेत..! माहित नाही किती पटतील.. नाही पटले तरी हरकत नाही..
.
आसावरी इंगळे 

Thursday, December 10, 2015

एक होता चिमणा व एक होती चिमणी..

 एक होता चिमणा व एक
होती चिमणी..
दोघात खूप
प्रेम होते..
एके
दिवशी चिमणी चिमण्याला म्हणाली.. तू
... मला सोडून,,उडून तर जाणार नाहीस
ना?...
...
तेंव्हा चिमणा म्हणाला मी जर उडून
गेलो तर तू मला पकडून घेशील...
चिमणी म्हणाली मी तुला त्यावेळी पकडू
तर
शकेल पण तुला मिळवू
नाही शकणार.. हे
ऐकुन चिमण्याचे डोळे भरून आले..
त्याने आपले पंख छाटून
टाकले..
आणि चिमणीला म्हणाला आता तर
ठीक आहे ना...?
आता आपण नेहमी सोबत राहू... ...... एके
दिवशी जोराचे वादळ
सुटले..
चिमण्याला पंख नसल्याने तो उडू
शकत
नव्हता.. चिमणी मात्र....
तो चिमणीला म्हणाला तू उडून जा..
चिमणीने
त्याला स्वताची काळजी घे असे
सांगून उडून गेली..
थोड्या वेळाने वादळ शमले... चिमणी परत आली..
पाहते तर चिमणा मरून
पडला होता..
बाजूच्या फांदीवर लिहिले होते..
प्रिये..
फक्त एकदा ..एकदाच जर तू मला म्हटले असते
कि मी तुला सोडून नाही जाऊ
शकत..
तर
कदाचित हे वादळहि माझे
काही बिघडवू शकले नसते... प्रेम हे असेच असते...
"जपुन टाक पाऊल...
इथे प्रत्येक वाट आपली नसते जपुन ठेव विश्वास...
इथे प्रत्येक माणुस आपला नसतो जपुन घे निर्णय...
इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो जपुन ठेव आठवण...
इथे प्रत्येक क्षण सारखा नसतो जपता जपता एक कर..
जपुन ठेव मन कारण...
"तेच फक्त'आपलं'असतं".....
"नशा"
"महोब्बत "
का  हो
"शराब"
का हो ...- या -
"व्हाट्सप्प "
का  हो
" होश "
तीनो मे खो जाते  है
" फर्क "
सिर्फ इतना है की,
"शराब"
सुला देती  है  ..
"महोब्बत "
रुला  देती  है ,
- और -
"व्हाट्सप्प " यारो  की
याद दिला  देती  है  ..!
      समर्पित
सभी प्यारें  दोस्त के लिए ... 💯  

टाटां

मित्रांनो, आपण मुंबई पुणे रेल्वेने प्रवास करतांना खोपोली जवळ मोठमोठे पाइप खाली गेलेले बघतो, हे काय आहे त्यामागची कथा !!
नुसेरवान टाटा आपला मुलगा जमशेट व कुटुंबासह नवसारीहून व्यवसाय करण्याकरिता मुंबई येथे १८४७ साली आले. तेव्हां जमशेट ८ वर्षांचा होता. दूरदृष्टी हा टाटा घराण्याचा वारसाच, पुढे कशाची गरज पडेल, काय केले पाहीजे हे त्यांना फार आधीच कळते.
१९०२ च्या नोव्हेंबर मधे जमशेटजी टाटा लॉर्ड हँमिल्टन यांना वळवण वीज प्रकल्पाचा प्रस्ताव घेऊन भेटले. मुंबई ची विजेची वाढती मागणी,गरज या सर्वाचा यांत विचार केला होता. परंतु या प्रस्तावास परवानगी मिळून काम चालू करण्यांस १९१० साल उजाडले. १९१० साली जमशेटजींनी २ कोटी रूपये भांडवल उभे करून फेब्रुवारी १९११ ला कामाला सुरवात केली. ७फूट व्यासाच्या पाइप मधून खंडाळा, लोणावळा येथे पडणारे तुफान पावसाचे पाणी १८०० फूट ऊंचीवरून खाली खोपोली येथे ७ पाइप लाइन टाकुन आणायचे, तेथे जनित्राद्वारे विज निर्माण करावयाची व ती मुंबईला पोहोचवायची अशी ही योजना होती. त्याकरता वळवण येथे दोन धरणे बांधून पाणीसाठा वाढवायचा की जेणेकरून वर्षभर विज निर्मिती चालु राहील.
१९११ मधे शुभारंभ झाल्यावर दुसऱ्याच दिवशी ७ हजार मजुर खंडाळा-लोणावळ्याच्या डोंगरदऱ्यांत रात्रंदिवस कामाला लागले. सरळ सुळके,गर्द झाडी यातुन पाइप वर चढवणे, उतरवणे, परत योग्य जागी जोडणे असे सर्व उच्च दर्जाचे काम चालु झाले. १९११ साली केलेल्या या कामांत आजही कोठे गळती नाही, की कोणताही पाइप फुटला नाही. प्रचंड वेगाने कित्येक वर्षे या पाइपातुन पाणी येत आहे व विज निर्मिती होत आहे. हे पाइप जर्मनीहून आणले होते, जनित्राची चक्रे स्वित्झर्लडहून आणली, जनित्र अमेरिकेहून, विज वाहुन नेणाऱ्या तारा इंग्लडहून आणल्या. हे सर्व टाटा कंपनीच्या लोकांनी ४ वर्षात पुर्ण केले. १९१५ मधे लॉर्ड विलींग्टन यांनी खोपोलीत कळ दाबल्यानंतर मुंबईच्या सिप्लेक्स गिरणीत दिवे लागले. १९११ साली दळणवळणाची साधने, उपजत टेक्नॉलॉजी, परिस्थिती, कम्युनिकेशनच्या सोयी या सर्वांचा विचार केला तर ह्या अफाट कामाची व दूरदृष्टीची टाटांची समज किती मोठी होती हे लक्षात येते.
टाटा, ही भारतीयांसाठी केवळ दोन अक्षरे नाहीत. संपत्ती निर्मिती हा टाटांचा उद्देश कधीच नव्हता उलट समाजाकडून आलेले पैसे समाजालाच परत करावयाचे हे त्यांचे धोरण होते.
देशवाद टाटांच्या रोमारोमात मुरलेला आहे. जे जे उदात्त, उत्तम आहे ते ते मी या देशासाठी घडवीन असा ध्येयवाद आहे. पैशाची उधळपट्टी नाही, भपका नाही, सवंग प्रसिद्धी नाही पण कर्तव्य आणी गुणवत्ता यात सर्वोच्च असण्याची उत्तुंग ध्येय आहेत. २६/११ च्या हल्ल्यानंतर त्यासाठी जबाबदार असणाऱ्या पाकिस्तानबरोबर त्यांनी व्यापार बंद केला. वाटेल ती किंमत देऊन टाटांच्या गाड्या खरेदी करण्यास आलेल्या पाकिस्तानी राजदूताला वाटाण्याच्या अक्षता दिल्या. आताही असहिष्णुतेच्या वादाचा केंद्रबिंदू असलेल्या त्यांचा ब्रँड अँबेसेडर असलेल्या आमिरखानला त्यांनी तडकाफडकी काढुन टाकले आहे. देशाभिमान व देशवाद ओतप्रोत भरलेल्या टाटांना या देशात मात्र सरकारकडुन स्वागत होत नाही कारण टाटा काम मिळण्यासाठी कोणताही भ्रष्टाचार करत नाहीत व गुणवत्ता तिळभरही कमी करण्यास नकार देतात!!
आज हिंदुस्तानातल्या कारखानदारीच्या पितामहांचा १७६ वा जन्मदिवस...
त्यांना कोटी कोटी प्रणाम🙏🏼

मुली !!

मुली !!
घरामध्ये जेव्हा मुलगी बोलते आणि बोलतच राहते तेव्हा घरातील प्रत्येक जण म्हणतो, "तोंड दुखत नाही का तुझं? किती बडबड, बडबड !"
आणि जेव्हा मुलगी शांत असते तेव्हा आई म्हणते, "बरी आहेस ना तू?"
वडील म्हणतात, "आज घरामध्ये एवढी शांतता का बरं?"
भाऊ म्हणतो, "रागावलीस का?"
आणि जेव्हा ती सासरी जाते, तेव्हा सगळे म्हणतात, "असं वाटतं घराची शोभाच गेली !"
""मुलगी म्हणजे घरातील खळाळतं अविरत संगीत !""
""मुलगी म्हणजे भावना, मोहकता, गोडवा आणि प्रामाणिकतेला समर्पित व्यक्ती !!""
""मुलींनी मुलगी असण्याचा व ज्यांना मुलगी आहे त्यांनी गर्व बाळगला पाहिजे !!!""
""तीचे अस्तित्व कधीच विसरता येणार नाही व तीची अनुपस्थिती बेचव जीवना सारखी असते !!!!!""
आपल्या जीवाभावाच्या  "
स्री" ला नक्की पाठवा ! मग नातं काही ही असो !!👍💐👌👌

नारायण मुर्ती यांनी लिहिलेल्या कथेचे भाषांतर.

नारायण मुर्ती यांनी
लिहिलेल्या कथेचे भाषांतर...
कथा खूप ह्रुदयस्पर्शी आहे
जरुर वाचा...!
.
माझी पत्नी आतून ओरडली,
"आता किती वेळ तो पेपर
वाचत बसणार आहात...?
आता ठेवा तो पेपर आणि
तुमच्या लाडक्या लेकीला
खायला दिलय ते
संपवायला सांगा...!"
.
मामला गंभीर
वळण घेणार
असे दिसलं..!
मी पेपर बाजुला सारला
आणि घटनास्थळी
दाखल झालो...
.
सिंधू,
माझी एकुलती एक
लाडाची लेक रडवेली
झालेली होती.
डोळे पाण्याने
काठोकाठ भरलेले.
.
तिच्या पुढे एक दहिभाताने
पूर्ण भरलेला बाऊल होता.
सिंधू, तिच्या वयाच्या मानाने
शांत व समजुतदार, गोड
आणि हुशार मुलगी होती.
.
मी बाऊल उचलला
आणि म्हणालो,
"बाळ, तू चार घास खाशील का..?
तुझ्या बाबा साठी...?"
.
सिंधू,
माझी बाळी; थोड़ी नरमली;
पालथ्या मुठीने डोळे पुसले.
आणि म्हणाली,
"चार घासच नाही,
मी सगळ संपविन."
थोडी घुटमळली
आणि म्हणाली,
"बाबा,
मी हे सगळ संपवल तर...
तुम्ही मला मी मागीन
ते द्याल..?"
.
" नक्की...!"
तीने पुढे केलेल्या
गुलाबी हातात मी हात दिला
आणि वचन पक्के केले.
.
पण आता मी थोडा गंभीर झालो.
"बाळ, पण तू कंप्यूटर किंवा
दुसर एखाद महागड खेळण
मागशील तर आता बाबाकडे
तेवढे पैसे नाहीयेत बेटा...!"
.
"नाही बाबा..! मला तस
काही नको आहे...!"
तिने मोठ्या मुश्किलीने
तो दहीभात संपवला...
.
मला माझ्या पत्नीचा आणि
आईचा खूप राग आला.
एवढ्या छोट्या मुलीला
कुणी एवढ खायला देतात...?
ते पण तिला न आवडणार.
.
पण मी गप्प बसलो.
सगळ मोठ्या कष्टाने खाऊन
संपविल्यावर हात धुऊन
सिंधू माझ्यापाशी आली...
.
डोळे अपेक्षेने मोठे करून.
आमच्या सगळ्यांच्या
नजरा तिच्याकडे होत्या.
"बाबा, मी या रविवारी सगळे
केस काढून टाकणार...!"
तिची ही मागणी होती...
.
"हा काय मुर्खपणा चाललाय...?
काय वेड बीड लागलय काय...?
मुलीचे मुंडण...? अशक्य...!"
.
सौ चा आवाज वाढत
चालला होता...!
"आपल्या सगळ्या
खानदानात आसल काही
कुणी केल नाही...!"
आईने खडसावले.
"ती सारखी टिव्ही पहात असते...!
त्या टिव्हीमुळे आपली संस्कृती
आणि संस्कार वाया चालले आहेत...!"
.
"बेटा, तू दुसर काही
का मागत नाहीस...?
या तुझ्या कृत्यामुळे
आम्ही सगळे दु:खी होऊ...!
तुला आम्हाला बघवेल का सांग...?"
.
"सिंधू, बेटा आमचाही विचार कर...!"
मी विनवणीच्या स्वरात म्हटले...
.
"बाबा, तुम्ही पाहिलत ना
मला तो दहीभात संपवन
किती जड जात होत ते...!"
.
आता ती रडायच्या बेतात होती.
"आणि तुम्ही मला त्याबदल्यात
मी मागीन ते द्यायचं
कबूल केल होतं...!
आता तुम्ही मागे हटता आहात.
मला कोणत्याही परिस्थितीत
दिलेल वचन पाळणा-या
राजा हरिश्चंद्राची गोष्ट
तुम्हीच सांगितली होती ना...?
.
आपण दिलेली वचने
आपण पाळलीच पाहिजेत...!"
मला आता ठाम पणा
दाखवणे भाग होते...
.
"काय डोके-बिके फिरलेय काय..?"
आई आणि सौ. एकसुरात...
.
आता जर मी दिलेला
शब्द पाळला नाही.
तर सिंधू पण दिलेला
शब्द तिच्या पुढल्या
आयुष्यात पाळणार नाही.
.
मी ठरविले,
तिची मागणी पूरी केली जाईल...
.
गुळगुळीत टक्कल केलेल्या
सिंधूचा चेहरा गोल असल्याने
आता तिचे डोळे खूप मोठे
आणि सुंदर दिसत होते...
.
सोमवारी सकाळी मी तीला
शाळेत सोडायला गेलो.
मुंडण केलेली सिंधू
शाळेत जाताना बघणे
एक विलक्षण दृष्य होत.
ती मागे वळली आणि
टाटा केला मी ही
हसून टाटा केला...
.
तेंव्हाच एक मुलगा
कार मधून उतरला आणि
त्याने तिला हाक मारली,
"सिंधू माझ्यासाठी थांब."
.
गंमत म्हणजे त्याचे ही
टक्कल केलेले होते.
अच्छा, हे असं आहे तर
मी मनात म्हणालो...
.
त्या कार मधून
एक बाई उतरल्या आणि
माझ्या पाशी आल्या..!
"तुमची सिंधू किती
गोड मुलगी आहे.
तिच्यासोबत जातोय
तो माझा मुलगा,
हरीष नाव त्याचे.
त्याला ल्यूकेमिया
(Blood cancer) झालाय.
.
येणारा हुंदका त्यानी
आवंढा गिळून दाबला
आणि पुढे म्हणाल्या,
.
"गेला पूर्ण महीना
तो शाळेत आला नाही.
केमोथेरपि चालु होती.
त्यामुळे त्याचे सगळे
केस गळाले.
तो नंतर शाळेत यायला
तयारच नव्हता.
कारण मुद्दाम नाही तरी
सहाजिकच मुले चिडवणार...
.
सिंधू मागच्याच आठवड्यात
त्याला भेटायला आली होती.
तिने त्याला तयार केले की
चिडवणा-यांचे मी पाहून घेइन
पण तू शाळा नकोस बुडवू...
.
मी कल्पनाही केली नव्हती
की ती माझ्या मुलासाठी
आपले इतके सुंदर केस
गमवायला तयार होईल...
.
तुम्ही तिचे आईवडील
किती भाग्यवान आहात.
अशी निस्वार्थी आणि निरागस
मुलगी तुम्हाला लाभली आहे..."
.
ऐकून मी स्तब्ध झालो.
माझ्या डोळ्यातून
अश्रू ओघळले.
मी मनाशी म्हणत होतो...
माझी छोटीशी परी
मलाच शिकवते आहे.
खर निस्वार्थ प्रेम
म्हणजे काय ते...
.
या पृथ्वी वर ते सुखी नव्हेत
जे स्वत:ची मनमानी करतात
सुखी तेच की जे दुस-यावर
जिवापाड प्रेम करतात आणि
त्यांच्यासाठी स्वत:ला
बदलायलाही तयार होतात...
.
आपल्यालाही आपलं आयुष्य
सिंधू सारख बदलता यायला पाहिजे...
😊😊😊😊😊😊😊😊
शेअर करायची गरजच नाही.
आवडली असेल ही लघुकथा
तर तुम्हीच ठरवा काय करायचं.

कपालभाती:

कपालभाती:
आज मी तुम्हाला प्राणायाम या मधली कपाभातिक्रिया केल्याने काय काय फायदे मिळतात ते सांगणार आहे. 
      कपालभतीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले मी पाहिले आहेत. कपाभातिमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयमपूर्ण होतो. 
      कपालभातीने हार्टमधले ब्लोकेज पहिल्या दिवसापासून उघडू लागतात व् 15 दिवसात पूर्ण ओपन होतात. कोणतेही औषध न घेता. कपालभाती करणार्याची हार्टची कार्यक्षमता वाढते. हार्टची कार्यक्षमता वाढवणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही. हार्ट फंशन नॉर्मल रहातं. अजुन एक सांगतो, कपालभाती करणाऱ्याचं हार्ट कधीच बन्द पडत नाही. हल्ली 70 ते 80 टक्के लोक हार्ट बन्द पडल्याने मरतात. 
     कपालभाती केल्याने शरीरांतर्गत व् शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ डीझोल होते. कपालभातीने शरीरात हिट जनरेट होते त्यामुळे गाठी विर्घळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो. ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस्ट असो अथवा यूटेरस मधले फाइब्रॉइड असो. नाव अनेक असले तरी गाठी होण्याची टेंडेंसी एकच असते. 
     कपालभातीने वाढलेलं कोलेस्टेरोल कमी होते. मुख्यबाब ही आहे की कपालभाती करू लागल्यावर पहिल्याच दिवशीपासून कोलेस्टेरोलची गोळी बंद करायला सांगतो. 
     कपालभातीने वाढलेलं ईएसआर, यूरिक एसिड, एसजीओ, एसजीपीटी, क्रिटेनिन, टीएसएच, हार्मोन्स, प्रोलक्टीन लेव्हल नॉर्मल होऊ लागते. कपाभाती केल्याने हीमोग्लोबिन एका महिन्यात 12% पर्यन्त पोचते. हीमोग्लोबिन वाढीच्या एलोपेथिच्या गोळ्या खाऊन कधीही कोणाचे हीमोग्लोबिन वाढलेले पाहिले नाही. एका वर्षात 16 ते 18 पर्यन्त जाते. महिलांच् हीमोग्लोबिन 16 व् पुरुषांच्ं 18 असायला हवे. हे उत्तम लक्षण मानले जाते. 
     कपाभातिमुळे महिलांच्या पिरिएड्सच्या सर्व तक्रारी एकामहिन्यात सामान्य होतात. हे पहात आलो आहे. 
     कपाभातिमुळे थायरॉइडचे आजार एका महिन्यात गायब होतात. याच्याही गोळ्या पहिल्या दिवसापासून बन्द करायला सांगितले जाते.  हे कपालभातीमुळे होते.
    एवढंच नाही तर, कपालभाती करणारा 5 मिनिटात मनाच्या पलीकडे जाता. गुड़ हार्मोन्स सीक्रेट होऊ लागतात. स्ट्रेस हामोंस गायब होतात. मनाचा व् शरीराचा थकवा नाहिसा होतो. कपालभातीने जी एकाग्रता येते ती इतरत्र येत नाही. किती विशेष आहे पहा. 
     कपाभातीने प्लेटलेट्स वाढतात. WBC. व्हाईटब्लड सेल्स, RBC. रेडब्लड सेल्स कमी किंवा जास्त झाल्या असतील तर त्या करेक्ट होतात. बैलन्स होतात. कपालभातीने सर्व बैलन्स होते. कुणी अंडरवेट रहात नाही नी कुणी ओव्हरवेट रहात नाही. दिवसाला एक एक किलो वजन कमी होते. वजन कमी किंवा वाढवण्यासाठी कपालभाती सारखा दूसरा उपाय नाही. कपालभातीने शरीर संतुलित रहते. अंडरवेट आसण जसा आजार आहे तसं ओव्हरवेट आसण ही आजारच आहे. 
      कपालभातीने कोलायटिस, अल्सरीटिव्ह कोलायटिस, अपचन, मंदाग्नि, संग्रहणि, जीर्ण संग्रहणि, आव असे शौच लागणार आजार बरे होतात. कोंस्टीपेशन, गैसेस, एसिडिटी हेही बरे होतात. समस्त पोटाच्या तक्रारी कपालभातीने दूर होतात. 
     कपालभातीने पांढरेडाग, सोरायसिस, एक्झिमा, लिकोडर्मा, स्कियोडर्मा असे त्वचारोग बरे होतात. स्कियोडर्मा वर जगात औषध नाही, जो कपालभातीने बरा होतो. पोट खराब असल्यानेच त्वचारोग येत असतात. जस जसे पोट ठीक होत जाते तस तसे त्वचारोगही बरे होत जातात. 
       अर्थ्राइटिस मधला अजुन एक प्रकार र्होमिटाइड अर्थ्राइटिस म्हणजे आर ऐ फैक्टर पॉझिटिव्ह होण. अर्थात इथे हाडांमधे विकृति येते. हाडांमधे टॉक्सिसिटी वाढते. एस्ट्रो अर्थ्राइटिस म्हणजे, हाडांमधल्या कुशन्सची झिज होते, कार्टिलेज तूटतात, लिगैमेट्स झिजतात, सांधे झिजतात. एस्ट्रो अर्थ्राइटिस मधे डॉक्टर्स औषध म्हणून स्टीरॉयड देतात. मेडिक्लसायन्स सागतं, स्टिरोइड मुळे एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे हाडं कमजोर होतात, ठिसुल होतात. गम्मत बघा, एस्ट्रो अर्थरायटिसमधे स्टिरोइड दिल्याने हाडं ठिसुल होतात व् त्याच रुगलाल स्टिरोइड दिल्याने एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे एक आजार जात नाही व् दूसरा आजार निर्माण केला जातो. असं आहे मेडिकलसायंस. विद्यानाच्या नावावर अज्ञान आहे की नाही. 
     कपालभातीने छोटी इंटेस्टाइनला संपूर्ण व्यायाम होतो. व्यायामाने अन्न पचु लागतं. अन्न पचल्याने, कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स आतड्यात शोषल जातात. कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स अव्हेलेब्ल झाल्याने , कुशन्स, लिगैमेंट्स, हाडं बनु लागतात व् 3 ते 9 महिन्यात, अर्थ्राइटिस, एस्ट्रो अर्थ्राइटिस, एस्ट्रो पोरोसिस यासारखे हाडांचे आजार कायमचे बरे होतात. 
       लक्षात ठेवा कैल्शियम, प्रोटीन्स, हीमोग्लोबिन, व्हिटैमिन्सच्या गोळ्या न पचताच शरीर बाहेर टाकते कारण केमिकल्स द्वारे बनलेल्या गोळ्या शरीरात शोषण्याची व्यवस्था नाही. आपल्या शरीरात रोज 10% बोनमास चेंज होत असते. ही क्रिया जन्मापासून मृत्यु पर्यन्त अखण्ड चालु असते. ती काही कारणाने बंद पडली की हाडांचे आजार येतात. कपालभाती ही क्रिया बंद पडुदेत नाही. त्यासाठी कपालभाती नियमित केलि पाहिजे. 
    विचार करा प्राणायामामधली एक क्रिया किती फायदे देते. एवढे फायदे एकाच ठिकाणी दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत, म्हणून प्राणायाम सर्वश्रेष्ठ आहेत. एक महत्वाची गोष्ट की आजारी, रोगी यांनी प्राणायाम योग्य, अनुभवी गुरुकडूनच शिकले पाहिजेत. अन्यथा गड़बड़ होऊ शकते. 
करा योग रहा निरोग
- श्री मधुसुदन देसाई