हल्ली एक नवीनच क्रेझ आली आहे.. वाढदिवसाच्या केकवर वाढदिवस असलेल्या मुलाची/मुलीची प्रतिमा केकने केकवर तयार करून घ्यायची अन मग हर्षोल्हासात ती केक कापायची! ... ज्या दिवशी मुलांच्या दीर्घायुष्याची व उज्ज्वल भविष्याची कामना करायची त्यादिवशी केकवर लावलेली त्यांची प्रतिमा कापायची..ती ही त्यांनीच! आपण आपल्या आयुष्याची दोरी कापल्यासारखी! मग त्या केकचे तुकडे करून सर्वांना वाटायचे!.. मुलांचे कौतुक करावे..अगदी आधुनिक पद्धतीने करावे परंतु अशा रीतीने! पटत नाही म्हणण्यापेक्षा योग्य वाटत नाही! .. बरं! पालकांना सांगावं तर त्यांच्या भावना दुखावतात! ..भावना कितीही चांगल्या असल्या तरी त्या व्यक्त करताना आपण नेमके काय करतोय याचा सारासार विचार करायला पाहिजे, असे मला वाटते!
.
काल एका वाढदिवसाला गेले होते..तिथे अतिशय सुंदर केक आणली होती..त्यावर वाढदिवस असलेल्या मुलीची प्रतिमा तयार केली होती..अतिशय आनंदात त्या मुलीने केकवरील आपलीच प्रतिमा कापली..त्याच उत्साहात सर्वांना आनंदात खिलवली! .. विचित्र वाटलं!.. काळाचा कितीही हवाला दिला तरीही विचित्रच वाटलं! .. मला तर ते 'हृदय' आकाराच्या किंवा 'हृदय' काढलेल्या केक्स कापलेल्याही बरोबर नाही वाटत.. हृदय कापायचं अन खायचं!.. भयानकच! .. खरं नसलं तर प्रतिमा तर असतेच नं.. अन कापलेले हृदय कशाचे चिन्ह असते! .. म्हणजे 'दिल के तुकडे तुकडे करके.. मुस्कुरा के खा गये... असेच काहीतरी..'!
.
..अर्थात हे माझे वैयक्तिक विचार आहेत..! माहित नाही किती पटतील.. नाही पटले तरी हरकत नाही..
.
आसावरी इंगळे

No comments:
Post a Comment